03:10 - Office Story



रात्रीचे तीन वाजले होते. आभि आजून ही ऑफिस मध्येच होता.

नुकताच तो त्या ठिकाणी Join झाला होता..

त्याच ऑफिस म्हणजे भव्य दहा मजली इमारत.

त्याची Secound Shift रात्री तीन वाजता सुटते पण आज कामाच्या गडबडीत त्याचं घडळ्याकडे लक्ष गेलं नव्हतं.

त्याच्या ऑफिस मधील इतर लोकं वेळ पाहून निघून गेले होते.

अचानक ऑफिस एवढं शांत कसे झालं हे लक्षात येताच त्याने आजूबाजूला पाहिलं. पूर्ण ऑफिस रिकामं...

त्याने घड्याळात पहिले तर तीन वाजून दहा मिनिटे झाले होते.

त्याने पटकन लॅपटॉप बंद केला आणि लिफ्ट कडे पळाला.

त्यांना Home Drop देणारी गाडी ही जास्तीत जास्त 3:15 पर्यंत थांबते आणि नंतर निघून जाते.

त्यामुळे आभि ला गडबड होती.

तो पळत लिफ्ट जवळ आला, लिफ्ट उघडली आणि आत शिरला.

त्याने Ground Floor च बटन दाबलं पण...

लिफ्ट खाली जाण्याऐवजी वर जाऊ लागली..

.

चुकून काहीतरी वेगळं बटन दाबलं असा विचार करून त्याने अजून एक - दोन वेळा Ground Floor च बटन दाबलं.

लिफ्ट काही थांबेना.. त्या छोट्याशा स्क्रीन वर दहा नंतर अकरा वा मजला दिसू लागला..

आभि ला जरा आश्चर्य वाटलं कर्म इमारत ही दहा मजली च होती..

अकरा नंतर बारा, शेवट तेरावा मजला..

लिफ्ट थांबली, दरवाजा उघडला..

आभि बाहेर आला, समोर जसे त्याचे ऑफिस होते तसेच दिसत होत..

चुकून आपण त्याचं Floor वर राहिलो असा विचार त्याच्या मनात आला आणि तो पुन्हा लिफ्ट जवळ जाऊ लागला..

इतक्यात, आभि !!!! 

कोणीतरी नाव पुकारल्याचा त्याला आभास झाला..

तो मागे वळला पण कोणीच नव्हतं.

तो काही पाऊल पुढे चालत गेला तर त्यासोबत काम करणारे कर्मचारी आप - आपल्या खुर्ची वर बसून काम करताना त्याला दिसले..

" वाह ! म्हणजे तुम्ही सर्व मिळून माझ्यासोबत Prank करत होतात तर... "

आभि स्वतःशीच बोलला आणि त्याच्या मित्राजवळ गेला..

" काय रे सम्या..! माझ्यासोबत Prank..? "

बोलता बोलता त्याने त्याचा हाथ खुर्चीवर बसलेल्या समीर च्या खांद्यावर ठेवला.

तसा तो मागे वळला. समीर चे डोळे काळे पडले होते, चेहऱ्यावर एक भयाण हसू..

.

आभि घाबरला.. दोन पाऊले मागे सरकला..

आजूबाजूला बसलेले सर्व आपल्या खुर्ची फिरवून आभि कडे पाहू लागले.

सर्वांचे डोळे तसेच पूर्ण काळे कुट्ट ! चेहऱ्यावर थरकाप उडवणारे हसू...

आभि जोरात ओरडला आणि घाबरून लिफ्ट कडे पळाला..

ते सर्व कर्मचारी त्याच्या मागे पळू लागले.

आभि लिफ्ट जवळ पोचला, लिफ्ट चा दरवाजा अजून उघडला नव्हता. ते सर्व मिळून त्याला पकडणार इतक्यात दरवाजा उघडला आणि आभि आत शिरला..

दोन चार हात दरवाजा बंद होताना थांबवत होते, आभि ने कसे बसे लाथ मारून ते दूर केले आणि दरवाजा बंद झाला..

.

यावेळी लिफ्ट खाली जाऊ लागली.

" Ground Floor " लिफ्ट चा आवाज आला तेव्हा कुठे आभि ने डोळे उघडले..

तो बाहेर आला, समोर त्याला घाबरलेला पाहून एक म्हातारा Security Guard त्याजवळ आला..

" काय झालं साहेब..? एवढे घाबरलात..? "

आभि जोर जोरात श्वास घेत म्हणाला,

" तो.. तेरावा मजाला.. तेथे... विचित्र लोकं.. काळे डोळे.. चेहऱ्यावर भयानक हसू.. मला पकडत होते... "

त्या Security Guard ला काही समजले नाही..

त्याने आभि ला पाणी दिलं.. 

थोडं शांत केल, तेव्हा आभि ने पुन्हा सर्व हकीकत सांगितली..

त्यावर तो Security म्हणाला,

" साहेब या बिल्डिंग ला दहा च मजले आहेत.. मग तुम्ही तेराव्या मजल्यावर कसे जाल..? "

एवढं सांगून ही काही उपयोग नव्हता शेवटी आभि ने त्याची Bag उचलली आणि घरी निघाला...

घरी पोचल्यावर ही त्याच्या मनातील भीती त्याला बैचैन करत होती.

त्याने गुगल वर त्या इमारती बद्दल शोधणं सुरु केल...

एक बातमी त्याला सापडली.. 

" एक IT पार्क मधील इमारतील लागली आग..

इमारती मधील वर चे तीन मजले जळून खाक.. आतापर्यन्त वीस जणांचा मृत्यू झाल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे "

आभि समजला की त्या इमारतीचे तीन मजले कुठे गेले..

इमारतीला आग लागण्याची वेळ होती मध्यरात्री तीन वाजून दहा मिनिटे...

.

तो नशीबवान होता जो वाचला.. याआधी असेच काही जण त्या इमारती मधून बेपत्ता झाले होते..

.

कशी वाटली स्टोरी मित्रानो..?

कमेंट मध्ये नक्की सांगा..!