The Last Click...
वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं हा आभि चा सर्वात आवडता विषय.
आज ही तो असाच एका डोंगराळ भागात फिरायला गेला होता.
डोंगरावर एक छोटासा इंग्रज काळातील वाडा आहे असे त्याला समजलं होत.
त्या वाड्यावद्दल काही नकारात्मक गोष्टी त्याच्या कानावर आल्या होत्या, त्या ऐकून च त्याची खूप इच्छा होत होती तिकडे जायची.
पण थोडीफार भीती मनात होती म्हणून च त्याने भर दुपारी तिकडे जायचं ठरवलं.
भूत वैगरे असेल तर ते दिवसा लोकांना त्रास देत नाही असा त्याचा समज होता.
अर्थात तो किती खरा आहे हे ही पुढे समजेल च.
.
दुपारचे तीन वाजले होते, उन्हात डोंगर सर करून तो वरती पोचलाच.
भूतांचं माहित नाही पण डोंगरावर येऊन प्रेम करणारे प्रेमी लोकं त्याला बरेच दिसली होती.
यामुळे त्याची भीती बरीच कमी झाली होती.
तो वर पोचला, समोर त्याला एक छोटासा पडका वाडा दिसला..
आजूबाजूला असलेल्या मोठ्या झाडांनी त्याला पूर्णपणे झाकून टाकलेलं.
इथपर्यंत जर एखाद कपल आलं च तर त्यांच्या सोयीसाठी हा पडीक वाडा म्हणजे स्वर्ग च..
आता आभि ला भीती याची होती की तो आत गेला आणि भुताच्या जागी नको त्या अवस्थेत एखाद कपल सापडलं तर काय होईल...
त्याने लांबून च त्या वाड्याचा एक फोटो काढला.
आजू बाजूला असणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा ही तो कॅमेराने आस्वाद घेऊ लागला..
बराच वेळ थांबूब तो आता त्या वड्या जवळ गेला..
जवळून वाडा बराच मोठा वाटतं होता.
एकावेळी चार लोकं सहज आत जातील असा भक्कम दरवाजा, चारही बाजूने बुरुजसारख्या भिंती.
काही ठिकाणी त्यांना चीर गेली होती तर काही ठिकाणी त्या पडल्या ही होत्या.
त्याने दरवाजा चा फोटो काढला.
दरवजा उघडायचा प्रयत्न केला पण तो काही उघडला नाही शेवटी पडलेल्या भिंती मधुन रस्ता बनवून तो आत शिरला.
आत मध्ये जुन्या काळातील वस्तू धूळ खात पडल्या होत्या. त्याने बरेच फोटो Click केले वेगवेगळ्या अँगल ने.
टेबल - खुर्ची, भिंतीवर लावलेले जुने फोटो जळून खाक झाले होते.
एका फोटो मध्ये एका बाई चा चेहरा त्याला दिसला.
त्याने त्याचा ही एक Click केला..
पुढे पूर्ण वाडा फिरून तो बाहेर आला, अंधार पडणार होता म्हणून त्याने वाड्यासमोर उभा राहून एक शेवटचा सेल्फी काढला आणि घरी निघाला..
घरी आल्यावर आधी तर तो देवाच्या पाया पडला.
नंतर कॅमेरा ठेवुन फ्रेश व्हायला गेला.
रात्रीचे अकरा वाजले होते, तो आता निवांत होता म्हणून त्याने त्याचा कॅमेरा जवळ घेतला..
आजच्या दिवसाचे फोटो पाहू लागला..
1st Click - घरातून निघाल्यावर एका घाट वळणावर सुंदर निसर्गाचा फोटो
2nd Click - डोंगराजवळ पोचल्यावर झाडावर असलेल्या माकडांचा काढलेला फोटो.
3rd Click - डोंगर चढताना झाडाच्या आड लपलेल्या Couples चा फोटो.
4th Click - डोंगर चढून वर आल्यावर लांबूब काढलेल्या वाड्याचा फोटो. तो वाडा फोटो मध्ये आता आधी भव्य आणि भयानक वाटत होता.
फोटो तर त्याने दुपारी काढला होता पण आता जेव्हा तो बघत होता तेव्हा रात्रीची वेळ होती
5th Click - वाड्यासमोर उभा राहून समोरील डोंगराचा काढलेला फोटो. यात ही भयाण अंधार आणि समोरील डोंगरावर पांढरी आकृती दिसली..
आभि घाबरला...
कॅमेरा मधील पहिले तीन फोटो तर बरोबर होते पण जसा तो वाड्याजवळ पोचला वातावरण बदलले होते आणि काही विचित्र गोष्टी कॅमेरात टिपल्या गेल्या होत्या..
घाबरत च त्याने सहावा फोटो बघितला..
6th Click - वाड्याच्या जवळून दरवाजाचा काढलेला फोटो. पण आता या फोटो मध्ये ती पांढरी आकृती त्याला दरवाजा समोर उभी असलेली दिसली.
तिचा चेहरा अजून ही स्पष्ट दिसत नव्हता.
7th Click - आभि पडलेली भिंत ओलांडून आत गेल्यावर आतील वास्तू चा काढलेला फोटो.
या फोटो मध्ये त्याला ती आकृती त्याजवळ येतना दिसली.
आता मात्र आभि चा चेहरा घामाने भरला.
भीतीने त्याचे हाथ कापू लागले.
त्याने कसा बसा पुढचा फोटो Open केला.
8th Click - वाड्यात एका जुन्या फोटोफ्रेम मधील महिलेचा टिपलेला फोटो.
यामध्ये काहीच गडबड नव्हती.
आभि ला वाटले सर्व ठीक झालं..
त्याने पटकन शेवटचा फोटो बघितला..
9th Click - वाड्यासमोर उभ राहून काढलेला सेल्फी.
वाडा आता पूर्णपणे एका भयानक महाल सारखा वाटत होता. मागे वीजा कडडत होत्या.. अंधार दाटला होता. आभि च्या मागे तीच पांढरी आकृती उभी होती.
तिचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता, ती तीच बाई होती जी त्या फोटोफ्रेम मध्ये होती पण तिचा चेहरा विद्रुप झालेला होता, दात जबड्यातून बाहेर आले होते, डोळे काळेकुट्ट..
आभि ने घाबरून कॅमेरा च फेकून दिला..
केमेरा खाली पडला आणि त्यातील एक शेवटचा फोटो अभि ला दिसला..
कॅमेरा मध्ये फोटो पाहताना घरातील एका कोपऱ्यातून कोणीतरी त्याचाच फोटो काढला होता..
अचानक सर्व लाईट बंद झाल्या, अभि ने मोबाइल चा टॉर्च लावला तर समोर तीच बाई उभी होती..
अभि शेवटची किंचाळी निघाली...
.
कॅमेरा मध्ये एक फ्लॅशबॅक सुरु झाला इंग्रज काळतला..
त्या बाई च नाव मोहिनी होत. तिला पाहून एक इंग्रज अधिकारी मोहित झाला आणि आपली हवस मिटवण्यासाठी त्याने तिला त्या डोंगरावरील वाड्यात नेऊन चुकीचं वर्तन केल आणि तिला मारून टाकलं.
तेव्हा पासून त्या वाड्याजवळ कोणी ही जात नव्हतं.
.
मित्रांनो कशी वाटली स्टोरी.?
कमेंट मध्ये नक्की सांगा !
